ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे आयोजन

नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे : नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         नागरिकांच्या विविध शासकीय कामांना गती देण्यासाठी तहसील कार्यालय भद्रावती येथे दिनांक ०९ मे २०२६ रोजी “श्री शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर” आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये विविध शासकीय विभागांच्या योजनांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

शिबिरात रेशन कार्ड, उत्पन्न दाखले, जातीचे दाखले, निराधार योजनेचे अर्ज, निवडणूक ओळखपत्र आदी कामांसह कृषि विभाग, आरोग्य विभाग, पशुवैद्यकीय विभाग तसेच नगर परिषद विभाग सहभागी होणार आहेत. संबंधित विभागांकडून नागरिकांना मार्गदर्शन करून विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.

या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन भद्रावतीचे नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये