ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावतीत मंदिरातील दानपेटी फोडून ३ हजार ५०० रुपयांची चोरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         भद्रावती  शहरातील भवानी माता मंदिर व खंडोबा मंदिरातील दानपेटीतून अज्ञात चोरट्यांनी एकूण ३ हजार ५०० रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना दिनांक २४ एप्रिलच्या मध्यरात्री घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी विशाल दिलीप दाते यांनी भद्रावती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भवानी माता मंदिरातील दानपेटीतून १ हजार रुपये तर खंडोबा मंदिरातील दानपेटीतून २ हजार ५०० रुपये अशी एकूण ३ हजार ५०० रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.

दिनांक २४ च्या मध्यरात्री ही चोरी झाल्याचा अंदाज असून, पहाटे मंदिर उघडण्यात आले असता दानपेटीतील रक्कम चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, धार्मिक स्थळांमध्येही चोरीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. भद्रावती पोलिस पुढील तपास करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये