घरात झोपेत असताना गळ्यातील सोन्याचा गोफ चोरट्यांनी कैचीने कापून केला लंपास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती शहरातील किल्हावॉर्ड परिसरात घरात झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचा गोफ अज्ञात चोरट्याने कैचीने कापून चोरून नेल्याची धक्कादायक घटना दिनांक २४ च्या मध्यरात्री घडली.
फिर्यादी अशोक कृष्णराव झाडे, रा. किल्हावॉर्ड, भद्रावती हे कुटुंबासह रात्री घरात झोपले होते. पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरटा घरात शिरला. घरात झोपलेल्या फिर्यादीच्या आईच्या गळ्यातील सुमारे १४ ग्रम वजनाचा सोन्याचा गोफ, अंदाजे किंमत ६० हजार रुपये, कैचीने कापून चोरी करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, गळ्यातील गोफ कापत असताना संबंधित महिलेला जाग आली. तिने आरडाओरड केल्याने चोरटा घटनास्थळावरून तात्काळ फरार झाला. मात्र, तो सोन्याचा गोफ घेऊन पसार झाला.
या घटनेची तक्रार भद्रावती पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत.



