ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा–नागपूर जिल्ह्यात गॅस टंचाई

वडगावातील साकी बारमध्ये मोठा साठा आढळल्याने प्रश्नचिन्ह

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला असून, सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गॅस मिळवण्यासाठी नागरिकांना 15 ते 20 दिवस आधी बुकिंग करावे लागत असून, तरीही वेळेवर सिलेंडर मिळत नाही. अनेक ठिकाणी ग्राहकांना स्वतः उपस्थित राहून रांगेत उभे राहावे लागत असल्याचे चित्र आहे.

अशा परिस्थितीत वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील वडगाव परिसरातील एका साकी बारमध्ये गॅस सिलेंडरचा मोठा साठा आढळल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आणि पुरवठा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सामान्य नागरिकांना गॅससाठी त्रास सहन करावा लागत असताना, एका ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात सिलेंडर साठा कसा उपलब्ध झाला, याबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “ही कोणाची मेहरबानी?” असा सवाल स्थानिक नागरिक करत आहेत.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन गॅस वितरण व्यवस्था पारदर्शक आणि सुरळीत करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये