ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“गांजा अंमली पदार्थाची विक्री करीता वाहतुक करणाऱ्या गुन्हेगारावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही”

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

  वर्धा पोलीस अधीक्षक मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, त्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री करणा-या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहिम राबविली असुन, दि. 24 एप्रिल 2026 रोजी स्था.गु.शा. वर्धा चे पथक पोलीस स्टेशन हिंगणघाट परीसरात हजर असतांना, मुखबीरतर्फे मिळालेल्या खात्रीषीर खबरेवरून जाम ते हिंगणघाट राष्ट्रीय महामार्ग क्र 44 वरील मौजा रिमडोह शिवार, कोचर खरर्डा फॅक्ट्रीजवळ सापळा रचुन एका सुझुकि बर्गमॅन मोपेड क्र एम.एच. 32 ए.डब्लु. 4877 वर एन.डि.पी.एस. कायद्यान्वये रेड केला असता, आरोपी अब्दुल रिजवान उर्फ टोनी अब्दुल रज्जाक शेख, वय 30 वर्ष, रा. संत कबीर वार्ड हिंगणघाट हा मोक्कावर रंगेहाथ त्याचे स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता गांजा अंमली पदार्थांची विक्री करीता वाहतुक करतांना मिळुन आला असुन, सदर गांजा मालाचा पुरवठा त्यास जावेद शेख रा. अॅटोमॅटिक चौक यशोधरा नागपुर याने केल्याचे निष्पन्न झाल्याने, जागीचं जप्ती पंचनामा कार्यवाही करून, आरोपीचे ताब्यातुन निव्वळ 02 किलो 228 ग्रॅम गांजा अमली पदार्थ, मोपेडसह जु.कि. 1,55,700 रू चा मुद्देमाल जप्त करून, दोन्ही आरोपीतांविरूध्द पो.स्टे. हिंगणघाट येथे एन.डि.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

  सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पो.उपनि. प्रकाश लसुंते, पो.अं अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, अक्षय राऊत, दिनेश बोथकर, अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये