पोटनिवडणूक असलेल्या ग्रामपंचायत हद्दित मद्यविक्री बंद

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीमध्ये पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून त्यानुसार 28 एप्रिल (मंगळवार) रोजी मतदान व 29 एप्रिल (बुधवार) रोजी मतमोजणी होणार आहे. सदर मतदान व मतमोजणी दरमान्य कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे दृष्टिकोनातून तेथील मद्य/बिअर विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवणे आवश्यक आहे.
चंद्रपुर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधील पोटनिवडणुकीकरीता मतदानाचा अगोदरचा दिवस म्हणजे 27 एप्रिल रोजी, मतदानाचा दिवस 28 एप्रिल रोजी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व मद्य व बिअर विक्री अनुज्ञप्त्या दोन्ही दिवस बंद राहतील. तर 29 एप्रिल रोजी ज्या ठिकाणी मतमोजणी आहे, त्या स्थानिक प्राधिकरणाच्या हद्दीतील सर्व मद्य व बिअर विक्री अनुज्ञप्त्या मतमोजणी निकाल लागेपर्यंत बंद राहतील. सदर आदेशाचा व नियमातील तरतुदीचा जे अनुज्ञप्तीधारक भंग करतील, त्यांच्या विरुध्द कडक कारवाई करण्यात येईल, याची त्यांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या आदेशात नमुद आहे.



