हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ हज यात्रा ही इस्लाम धर्मातील पाच प्रमुख कर्तव्यांपैकी एक महत्त्वाची धार्मिक यात्रा आहे, जी शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम मुस्लिमांनी आयुष्यात एकदा तरी करणे अनिवार्य मानले जाते. गोंडपिपरी येथून या यात्रेकरीता जाणाऱ्या शेख रशीद भाई आणि राजीक कुरेशी यांचा सत्कार रफिक शेख यांच्या हस्ते (दि.२४) रोजी करण्यात आला
सौदी अरेबियातील मक्का येथे ‘जिल हिज्जा’ या इस्लामिक महिन्यांत होणारी ही यात्रा ५-६ दिवस चालते. ही यात्रा आत्म्याची शुध्दी आणि अल्लाहप्रती समर्पण दर्शवते. यात्रेकरू (हाजी) इहराम (पांढरे वस्त्र) परिधान करतात, अराफातच्या मैदानात प्रार्थना करतात आणि मशिदीत नमाज अदा करतात.
भारतातून हज यात्रेचे नियोजन केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयांतर्गत हज कमिटी ऑफ इंडिया द्वारे केले जाते. या यात्रेकरीता गोंडपिपरी येथून जाणाऱ्या शेख रशीद भाई आणि राजीक कुरेशी यांचा सत्कार मक्का मस्जिदचे मौलाना फारुक रजा यांच्या प्रमुख उपस्थितीत शेख रफिक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी हारून सय्यद, हसन शेख, इब्राहिम भाई, मोईन भाई, कादिर शेख, रहेमत अन्सारी, हुसेन शेख आदींची उपस्थिती होती.



