ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वारकरी संप्रदाय मधील महाराजांबद्दल आक्षेपार्ह व अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या विकास लवांडेवर कठोर कारवाई करा

देऊळगाव राजा येथील वारकरी संप्रदाय मधील नागरिकांची मागणी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

तहसीलदार व ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते विकास लवांडे या व्यक्तीने सार्वजनिकरित्या वारकरी संप्रदायातील वीस जेष्ठ किर्तनकारांवर “घुसखोर” व “धर्मांध” असे अत्यंत आक्षेपार्ह अपमानास्पद व्यक्तव्य केल्याने संपूर्ण वारकरी व धर्माभिमानी जनमानसांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील श्री.संजयमहाराज पाचपोर, श्री.प्रकाशमहाराज जवंजाळ, श्री.उद्बोधमहाराज पैठणकर यांची नावे आहेत. विकास लवांडे यांच्यावर कठोर कारवाई करून तत्काळ अटक करावी अशी मागणी

 देऊळगावराजा तालुक्यातील सकल वारकरी व धर्माभिमानी बांधवांच्या वतीने दिनांक २४ एप्रिल रोजी मा.नायब तहसीलदार डॉ उमेश मुंढे व मा.ठाणेदार ब्रह्मा गिरी यांना निवेदन देऊन करण्यात आली.

याप्रसंगी  देऊळगावराजा तालुक्यातील सकल वारकरी संप्रदाय व धर्माभिमानी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये