ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस ठाणे वर्धा शहर गुन्हे प्रगटीकरण पथकाची कामगीरी

अवैध विदेशी दारू वाहतुक करणारे दोन आरोपी जेलबंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 24.04.2026 रोजी पोलीस स्टेशन वर्धा शहर येथील गुन्हे प्रगटीकरण पथकातील पोलीस अधिकारी/अंमलदारांनी केलेल्या कार्यवाहीत अवैध्य दारूविक्रेता 1) नौशाद शाह रमजान शाह 2) राकेश गंगाधर चतारे दोन्ही रा. इंदीरानगर, आर्वी नाका, वर्धा याचेवर दारूबंदी कायदयाअन्वये कार्यवाही करून दोन्ही आरोपीस अटक करण्यात आली. दिनांक 24.04.2026 रोजी मुखबीरकडुन मिळालेल्या खात्रीशीर खबरेची तात्काळ दखल घेत अवैध्य दारूवाहतुक करणाऱ्या वाहनाबाबत मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून आरती चौक वर्धा येथे नाकेबंदी करून उभे असतांना वाहन कमांक एम.एच. 32 एन.पी. 7727 येताना दिसल्याने त्यास थांबण्याचा ईशारा दिला असता वाहन चालकाने वाहन न थांबविता जेलरोडने पळुन गेल्याने त्याचा पाठलाग करून जेलरोडवर वाहन थांबविले असता वाहनाचे झडतीमध्ये अवैध्यरित्या बिनापासपरवाना 1) विदेशी दारू ऑफीसर चॉईस कम्पणीच्या 750 एम.एल. च्या 168 बॉटल, 2) विदेशी दारू ऑफीसर चॉईस ब्लु कम्पणीच्या 750 एम.एल. च्या 36 बॉटल, 3) विदेशी दारू रॉयल स्टॅग कम्पणीच्या 750 एम.एल. च्या 36 बॉटल, 4) एक मारूती सुझुकी बलेनो चारचाकी कार क. एम.एच. 32 एन.पी. 7727, 5) एक मोबाईल फोन असा जु.कि. 7,09,200 रू चा मुद्देमाल जप्त केला. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री सौरभ अग्रवाल, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री सदाशीव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रमोद मकेश्वर, पोलीस निरीक्षक श्री संतोष ताले, प्रभारी पो.नि. श्री अजय भुसारी यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रगटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड, पोलीस अंमलदार गजेंद्र धर्मे, नितीन ईटकरे, सचिन धुर्वे, अमोल तिजारे व इतर यांनी केली. गुन्हयाचा पुढिल तपास पो.उप.नि. शरद गायकवाड करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये