गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सायकील चोरीचा गुन्हा उघड – दोन आरोपी ताब्यात

सायकली चोरून आणण्याकरीता वापरलेला ऑटो व मोटार सायकलसह एकूण ९० हजाराचा माल जप्त

चांदा ब्लास्ट

हकिकत या प्रमाने आहे की वरील नमूद घटना तारीख वेळी व स्थळी यातील फिर्यादि हे धुनीवाले मठ कडुन आपले घरी येत असतांना त्यांचे गाडीचे पेट्रोल संपल्याने व त्यांचे जवळ पेट्रोल भरण्याकरीता पैसे नसल्याने त्यांचे ताब्यात असलेली मोटार सायकल बजाज सीडी 100 क्रमांक एम.एच. 32 के 6069 हि दिंनाक 25/07/2023 रोजी रात्री 10/00 वा. दरम्यान धुनीवाले मठ ते आर्वी नाका रोडवरील जयगोविंद हार्डवेअर दुकानाचे समोर गांधी नगर वर्धा येथे उभी करून पैसे आणण्याकरीता पायदळ घरी गेलो नंतर एक तासानी त्याचे मोटार सायकल जवळ परत आल्यानंतर तेथे फिर्यादीची मोटार सायकल बजाज सीडी 100 एम.एच. 32 के 6069 जुनी वापरती किंमत 25000/- दिसली नाही म्हणुन फिर्यादीने आजुबाजुला मोटार सायकलचा शोध घेतला मिळुन आली नसल्याने कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली असल्याने फिर्यादीचे लेखी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

पो.स्टे. च्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार संजय पंचभाई ब.न.656 यांनी ठाणेदार कैलास पुंडकर यांचे मार्गदर्शनात तपासाची चक्रे फिरवत मुखबीर कडुन मिळालेल्या खात्रीशीर खबरे वरून घटनास्थळी जावुन दोन इसम हे वसंत प्राथमिक शाळेचे मागे साने गुरूजी नगर मध्ये अॅटो मध्ये सायकली व मोटार सायकल टाकत मिळुन आले. त्यांना नावं, गावं विचारले असता त्यांनी आपले नाव 1) सचिन हरीभाउ झुंझुरकर वय 28 वर्ष रा. वार्ड नं. 2, हनुमान मंदीर जवळ अधिवासी कॉलनी वर्धा. 2) अविनाश मनोज परचाके वय 23 वर्ष रा. इंदिरा नगर झोपडपटटी, आर्वी नाका वर्धा त्यांना सखोल विचारपुस करून त्यांचे जवळ असलेल्या तिन चाकी अॅटो मध्ये गुन्हयातील चोरीस गेलेली एक बजाज सीडी 100 मो.सा. क्रमांक एम.एच. 32 के. 6069 जुनी वापरती मो.सा. तसेच जुन्या वापरत्या दोन सायकली मिळुन आल्या. सायकली बाबत विचारपुस केली असता चोरून आणल्याचे दोन्ही आरोपींनी सांगितले. वरून दोन्ही सायकली व चोरून आणण्याकरीता वापरलेला तिन चाकी अॅटो क्रमांक एम.एच 40 पी 204 तसेच गुन्हयातील मोटार सायकल क्र. एम.एच. 32 के. 6069 असा मुददेमाल जु.कि. 90,000/- रू चा माल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. नुरूल हसन सा, अपर पोलीस अधीक्षक श्री. सागर कवडे सा. उप विभागीय पोलीस अधीकारी वर्धा श्री. रोषन पंडीत साहेब, ठाणेदार पोलीस स्टेशन वर्धा शहर श्री. कैलास पुंडकर सा. यांचे मार्गदर्शनात पोलीस हवालदार संजय पंचभाई, पोलीस शिपाई राजेश डाळ, शाम सलामे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये