ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेवानिवृत्त कर्मचारी संघटनाच्या वतीने पोलिस दलात निवड झालेल्या अजय शिवरकर याचा सत्कार 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

श्री.अजय पांडुरंग शिवरकर, याची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्यानिमित्त देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना देऊळगाव राजा ,सहकार महर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव, जनसेवा सामाजिक संघटना व जेष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने सत्कार समारंभ विरंगुळा भवन येथे आज आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनाचे अध्यक्ष बळीराम मापारी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे मानद संचालक गोविंदराव अहिरे, प्रकाश खांडेभराड, मधुकर शेळके, प्रमिलाताई झिंजे, होत्या.

यावेळी शांतिलाल निरफळे,प्रा.अशोक डोईफोडे, प्रकाश खांडेभराड, घनश्याम भंडारे, अरुण सपाटे, गोविंद बोरकर, यांनी मनोगत व्यक्त केले संचालन प्रा. विजय रायमल यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री प्रकाश अहिरे यांनी केले याप्रसंगी मधुकरराव धुळे, सुर्यभान पंडीत, देविदास भालेराव,पंडितराव पाथरकर, बाबुलाल शिवरकर, पांडुरंग शिवरकर,रामदास कुलथे, मार्तंड आप्पा घिके,धर्मराज हनुमंते,निरजभाऊ कांबळे, दत्तात्रय तर्फे,सिंधुसागर धुळे, रविंद्रभाऊ इंगळे, सदानंद झिंजे उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये