ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महर्षी वसिष्ठ वेद विद्यालयचा चतुर्थ वर्धापन दिन साजरा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

महर्षि वसिष्ठ_वेद_विद्यालय श्रीसंत तुकाराम महाराज वारकरी विद्यालय,कृष्णप्रिया गोशाळा – सिद्धान्तसार ग्रंथालयाचा चतुर्थ वर्धापनदिन मोठ्या उत्साहात श्री नरहरीनाथ महाराज संस्थान देऊळगाव येथे साजरा करण्यात आला, याप्रसंगी शालेय शिक्षण अध्यापक व इतर सहयोगीजनांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या विद्यालयाचे विद्यार्थी  रुद्र महाले,श्रीधर बागडी, मधुर देशपांडे यांनी अनुक्रमे इंग्रजी, मराठी व संस्कृत भाषेतून अतिशय सुंदर सादरीकरण केले.

परमपूज्य श्री.मोहननाथमहाराज पैठणकर यांच्या पावन सानिध्यात विधानपरिषदेचे आमदार तथा तर्पण फाऊंडेशनचे प्रमुख आमदार श्री.श्रीकांत भारतीय, आमदार श्री.मनोज कायंदे, जालन्याचे मा.आमदार श्री. कैलास गोरंट्याल, श्री.संदीप माहोरकर,श्री.राजेश भुतडा, डॉ.गणेश मांटे , डॉ कृष्णा कोरडे व इतर मान्यवर तथा भाविक सज्जनांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

ह भ प वेदविभूषण श्री उद्बोध महाराज पैठणकर यांनी प्रास्ताविक मधून वेद विद्यालय, वारकरी विद्यालय, गोशाळा, ग्रंथालय यांच्या प्रगती चा आढावा सादर केला.

आमदार श्रीकांत भारतीय यांनी देऊळगाव राजा येथील वेद विद्यालय व वारकरी विद्यालय संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव असल्याचे सांगून याच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन दिले.

आमदार मनोज कायंदे व माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आपल्या भाषणात संस्थान च्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार असल्याचे सांगीतले, कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन गोपाल पठाडे, छत्रपती संभाजी नगर,यांनी केले कार्यक्रमाला शहरातील प्रतिष्ठित नागरिक, पुरुष, महिला व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये