विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, कोरपना येथे खरीप कर्ज वाटपाचा शुभारंभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना :_ खरीप हंगाम २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर, शेतकर्यांना वेळीच आर्थिक पाठबळ मिळावे या उद्देशाने विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, कोरपना (र.नं. १६५) च्या वतीने कर्ज वाटप सोहळा उत्साहात पार पडला. बँक व संस्थेच्या वतीने ३०९ सभासदादांना चार कोटी छहान्नव लाख अकरा हजार शंभर रुपये.कर्ज मंजूर करण्यात आले.सभासद शेतकर्यांना कर्जाच्या धनादेशाचे वितरण करून या हंगामाचा श्रीगणेशा करण्यात आला.
बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली,बँकेचे संचालक. विजयराव बावणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्ष. सुनंदा दिलीप मालेकर, उपाध्यक्ष. मारोती रासेकर , संचालक दादाजी गोवारदीपे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच माजी अध्यक्ष भारत चन्ने,पंढरीनाथ चन्ने, रसूल पटेल यांनीही उपस्थित राहून शेतकर्यांना मार्गदर्शन केले.
शेतकर्यांचा सहभाग व प्रशासकीय नियोजन
संस्थेचे सभासद संजय धगडी, विजय टोंगे, दशरथ झाडे, सुभाष चामाटे यांच्यासह अनेक शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते. बँकेचे व्यवस्थापक सचिन चन्ने ,निरीक्षक अमोल खाडे , उपव्यवस्थापक महेश मुसळे साहेब यांनी कर्ज वाटपाच्या तांत्रिक प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करून शेतकर्यांना सुलभ सेवा देण्याची ग्वाही दिली.
संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे योगदान
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे गटसचिव. हेमंत लोडे, लिपिक शब्बीर शेख , शिपाई कवडू मडावी यांच्यासह बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
शेतकर्यांनी या कर्जाचा विनियोग शेतीच्या सुधारणेसाठी करावा आणि खरीप हंगामात उत्तम उत्पादन घ्यावे. असा सूर या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.



