ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मंदिरात चोरी करणारे ३ आरोपी ताब्यात

एकुण ४ लाख ८१ हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन, सेलु येथे दिनांक ०८/०४/२०२६ रोजी फिर्यादी नामे श्री. आकाश रविंद्रजी म्हैसकर, वय ३२ वर्षे, रा. टाकळी शहशी ता. सेलु ह. मु. वाघमारे ले आउट वडगाव रोड सेलु यांनी तक्रार दिली कि, फिर्यादी हे वर्धा येथे गेले असता दि. ०७/०४/२०२६ चे १५/४६ वा. ते १५/४९ वा. चे दरम्याण ०२ अनोळखी इसमांनी केळझर येभील बुद्ध विहारामध्ये प्रवेश करून तेथे ठेवुन असलेल्या दान पेटी तील अंदाजे २०,०००/-रू. काडून चोरून नेले अश्या फिर्यादी यानी दिलेल्या तकार वरून अपराध क्रमांक २७६/२६ कलम ३०५(ड), ३(५) बि.एन.एस. अन्वये गुन्हा नोंद करून तपासावर होता.

सदर गुन्हयाचा संमातर तपास स्थानिक गुन्हे शाखा, वर्षा तर्फे करीत असता गुन्हयाचे घटनास्थळावर घटनेवेळी असलेले सि.सी.टी. व्ही. फुटेज प्राम करून सदर सि.सी.टी. की. फुटेज मध्ये विसत असलेले आरोपी हे मानेवाडा, नागपुर येथील असल्याचाबत माहीती मिळाल्याने नागपुर येथे जावून आरोपीतांचा कशोशीने शोध घेवून आरोपी १) अनिकेत समीर जुगनाके उर्फ बाटकर, वय २१ वर्ष, रा. सोनु पथरीया यांचे परी किरायाणे, गल्ली क ०४ व्दारकापुरी, रामेश्वरी रोड, नागपुर जि. नागपुर, २) अमीत छन्नुलाल सहरीया, वय २२ वर्ष, रा. प्लॉट नं. १५०, नवीन नगर, बजार चौक अवाळ, पारडी, नागपुर, ३) पृथ्वी उर्फ विजय कुशिंद्र हत्तीमारे, क्य २० वर्षे, रा. प्लॉट नं. ५१, पंडीकानगर मानेवाडा, बेसा रोड, नागपुर याना ताब्यात घेवुन त्यांना गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचे कबुल करून सदर गुन्ह्या व्यतीरीक्त पोलीस स्टेशन, रामनगर हद्‌दीत येणाऱ्या हनुमान मंदीर नागठाणा रोड येथील हनुमान मंदीरातील दान पेटी फोडल्याचे कबुल केले. त्याचे ताब्यातुन बौध्द विहार, केळझर व हनुमान मंदिर नागठाणा मंतीर येथील १) एकुण नगदी ११,५००/-रू. २) ०४ अॅन्ड्रॉईड मोवा, कि, ४५,०००/-रु. ३) एक के. टी. एम डयुक मो. सा. कि, २,५०,०००/-४, ४) एक पल्सर एम. एस. १६० मो. सा. कि. १,७५,०००/-रु असा एकूण ४,८१,५००/-रु. चा मुद्देमाल जप्त करून आरोपीतांना पुढील तपासकामी पो. स्टे. सेलु बांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार आग्रवाल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे याचे मार्गदर्शनात पोलीस निरीशक विनोद चौधरी, पोलीस अंमलदार सचिन इंगोले, भुषन निघोट, धर्मेंद्र अकाली, प्रमोद पिसे अमोल नगराळे, मंगेश चामे, अरविन्द इंगोले सर्वनेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्षा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये