जिल्हाधिकारी विनय गौडा यांचा नागरी सत्कार, वसुमना पंत यांचे स्वागत उद्या
प्रियदर्शिनी सभागृहात नागरी सत्कार सोहळा व निरोप समारंभ; मान्यवरांची उपस्थिती

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर जिल्ह्यात आपल्या कार्यकाळात उत्कृष्ट, पारदर्शक व जनहितकारी कामगिरी करून नागरिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारे जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा जी. सी. यांचा कृतज्ञतापूर्वक नागरी सत्कार व निरोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. त्याचबरोबर जिल्ह्याच्या नव्या जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारणाऱ्या श्रीमती वसुमना पंत यांचे स्वागत व सत्कारही करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम रविवार, दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता प्रियदर्शिनी सभागृह, चंद्रपूर येथे होणार आहे.
कार्यक्रमास चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच स्वागताध्यक्ष म्हणून आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार (माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री, महाराष्ट्र शासन) उपस्थित राहणार आहेत.
नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. “जनसेवा, सुशासन आणि विकासासाठी एकत्र येऊया” हा संदेश यावेळी देण्यात आला आहे.


