वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश
अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा जिल्हा पोलिसांनी १ जानेवारी २०२६ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत गुन्हे उघडकीस आणण्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या तीन महिन्यांत विविध प्रकारच्या गुन्ह्यांवर प्रभावी कारवाई करून मोठ्या प्रमाणात गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा, बलात्कार, विनयभंग, दुचाकी चोरी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये शंभर टक्के उघडकीचे प्रमाण नोंदवण्यात आले आहे. तसेच चोरी, घरफोडी, फसवणूक आदी गुन्ह्यांमध्येही उच्च प्रमाणात तपास पूर्ण करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, एकूण गंभीर गुन्ह्यांपैकी बहुसंख्य गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असून, काही गुन्ह्यांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त उघडकीचे प्रमाण दिसून आले आहे. या काळात जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास पोलिस यंत्रणा यशस्वी ठरली आहे.
वर्धा पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, पुढील काळातही गुन्हेगारीवर प्रभावी आळा घालण्याचा निर्धार पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.आहे.


