ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस स्टेशन देवळी येथील मागील ५ महीण्यापासुन पसार असलेला आरोपी नामे राकेश हरीचंद्र वाघन्ना वय ३० वर्ष रा. भिडी ता. देवळी जि. वर्धा देवळी पोलीसांच्या ताब्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक १२/०२/२०२६ रोजी मौजा भिडी येथील फिर्यादी नामे पाडुरंग उत्तमराव डफरे यांना आरोपी राकेश वाघन्ना व त्याचे ३ साथीदार यांनी पकडुन त्यांनी सोबत आणलेल्या लाल रंगाच्या गाडीत टाकले व हाथाबुक्यानी मारहाण करून राकेश वाघन्ना यांने लाकडी काडीने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली व ०३ लाख रूपये मागितल्याची घटणा झाली होती. त्यासंदर्भात पो. स्टे.देवळी येथे अप. कंमाक ११४/२०२६ कलम १४०(२), (३), ११८(१), ११५(२), ३५१ (२), (३), ३५२, ३(५) बी.एन.एस २०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यांत आला होता.

सदर गुन्हयांचे गांर्भीय लक्षात घेवुन लगेच योग्य दिशेने तपास करीत यातील अज्ञात आरोपीतांचा देवळी पोलीसांनी कसोसीने शोध घेवुन आरोपी राकेश वाघन्नाचे ०३ साथीदार यास गुन्हयात अटक करण्यात आली होती पंरतु राकेश वाघन्ना हा मागील ५ महीण्यापासुन नागपुर, अमरावती, यवतमाळ, अशा विविध ठिकाणी फिरत राहत होता. देवळी पोलीसांनी त्याचेवर पाळत ठेवुन दिनांक २४/०७/२०२६ रोजी अटक करून मा.विघमान न्यायालयासमोर पेश करण्यात आले. मा. विघमान न्यायालयाने आरोपी राकेश हरीचंद वाघन्ना वय ३० वर्ष रा. भिडी ता. देवळी जि. वर्धा यास ०४ दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे.

सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन टोळयाने गावात फिरत असतो. त्याचेवर सरकारी कर्मचारी हल्ला, दुखापतीचे गुन्हे, तसेच दारूबंदीचे एकुण २३ गुन्हे दाखल आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक, श्री. सौरभकुमार अग्रवाल सा, (भापोसे), मा.अपर पोलीस अधीक्षक, श्री. सदाशिव वाघमारे सा., मा. सहा. पोलीस अधीक्षक, डॉ. वंदना कारखेले, उपविभागीय पो.अ. उपविभाग पुलगाव, यांचे मार्गदर्शनाखाली मा. ठाणेदार सपोनि/संदीप कापडे, यांचे सह पोउपनि शिवराज जाधव, पोना दुर्गेश बानते ब.नं.५६९, पोशी. गणेश पवार ब.नं. ९७६ यांनी केली आहे. गुन्हयांचा पुढील तपास पोउपनि शिवराज जाधव हे करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये