ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आषाढी एकादशी निमित्त श्रीसंत नरहरीनाथमहाराज संस्थान, श्रीक्षेत्र देऊळगावराजा येथे तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांचे शुभहस्ते सपत्नीक श्रीरुक्मिणी पांडुरंगाची प्रशासकीय महापूजा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी प्रा .अशोक डोईफोडे

देऊळगाव :- श्रीसंत नरहरीनाथ महाराज संस्थान येथे वसंत पंचमी दिनांक ११ फेब्रुवारी रोजी महर्षि वसिष्ठ वेद विद्यालय व श्रीसंत तुकाराम महाराज वारकरी विद्यालयाच्या प्रथम पदवीदान समारंभ, श्रीसंत नरहरिनाथमहाराज त्रिशताब्दी जयंत्युत्सव, व श्रीसंत नरहरिनाथमहाराज जीवनगौरव पुरस्कार समारंभाचे अधिकृत बोधचिन्ह (Logo) चे आषाढी एकादशीच्या पर्वकाळी तहसिलदार वैशाली डोंगरजाळ , मठाधिपती मोहन महाराज पैठणकर, हभप उदबोध महाराज पैठणकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.तर आषाढी एकादशी निमित्ताने या मठातील श्री विठ्ठल रुक्मिणी ची महापूजा तहसिलदार वैशाली डोंगरजाळ यांचे हस्ते सपत्नीक करण्यात आली. नाथपीठ ३०० असे या लोगोचे ब्रीद वाक्य आहे. यामध्ये संस्थानाची तीनशे वर्षांची परंपरा, पांडुरंगाचा गंध, आणि खालील ज्ञानदान, सेवाकार्य या शब्दातून विद्यालयाचे कार्य, पुरस्काराचे कार्य अधोरेखित होते आहे. अशा विशेष अंगाने या बोधचिन्हाची निर्मिती करण्यात आलेली आहे. याप्रसंगी श्रीसंत नरहरिनाथ महाराज सेवा समितीचे सदस्य व परिसरातील अनेक भाविक भक्त उपस्थित होते. मागील चार वर्षांपासून प्रतिवर्षी आषाढी एकादशीचे दिवशी तहसीलदार देऊळगावराजा यांच्या शुभहस्ते या महापूजेचे आयोजन करण्यात येते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये