ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापनावर प्रशिक्षण संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर येथील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स मध्ये जल व्यवस्थापन व आग लागल्यानंतर कुठल्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे या संदर्भात आपत्ती व्यवस्थापनाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

या कार्यक्रमांमध्ये महापूर आल्यास लोकांचा जीव कसा वाजवता येईल किंवा प्राण आणि कशी कमी करता येईल यासंदर्भात तसेच एखाद्या ठिकाणी आग लागल्यास कुठल्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे जसे घरी आपण इलेक्ट्रिक शेगडी गॅस शेगडी वापरतो तेव्हा काही धोका झाल्यास कुठल्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे यासंदर्भामध्ये प्रशिक्षणाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक डॉ. अजय कुमार शर्मा यांनी केले असून प्रशिक्षणाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव सर होते. या कार्यक्रमाचे प्रशिक्षक श्री उत्तमजी सेन प्रमुख आपत्ती व्यवस्थापन, माणिकगड सिमेंट कंपनी येथील वरिष्ठ अधिकारी असून त्यांच्या समोर महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींना हे प्रशिक्षण दिले. तसेच मोनाली ठाकूर व त्यांच्या टीम ने ही विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन चे प्रात्यक्षिक करून दाखवले आणि वेळेवर अचानक उत्पन्न झालेल्या आपत्तीवर कशी मात करता येईल यासंदर्भात मार्गदर्शन केले.

महाविद्यालयातील एन. एन.एस.चे समन्वयक प्रा. वानखेडे व क्रीडा निर्देशक डॉ अनिस खान यांनी ही कार्यशाळा संपन्न करण्यासाठी मुख्य भूमिका बजावली. या कार्यक्रमाचे संचालन महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. मनोहर बांद्रे यांनी केले असून आभार प्रदर्शन प्रा. चेतन वैद्य यांनी केले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये