ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने कु.अमृता जीवने सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          शिक्षण क्षेत्रातील निस्सीम सेवा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या शिक्षकांचा गौरव म्हणजे समाजाचा गौरव असतो. शहरातील विजासन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या उपक्रमशील सहा. शिक्षिका कु.अमृता जीवने यांना नुकताच सण २०२५_२६ यावर्षाचा प्रतिष्ठेचा महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला .ध्येय फाउंडेशन महाराष्ट्र तर्फे पुणे येथे आयोजित एका भव्य सोहळ्यात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हा बहुमान त्यांना बहाल करण्यात आला.

 पुणे निगडी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात पार पडलेल्या एज्युकेशन आयकॉन समिट २०२६ मध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेते दत्तात्रेय वारे गुरुजी यांच्या शुभहस्ते अमृता जीवने या शिक्षकेला सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित शिक्षक तज्ञांच्या टाळ्यांच्या कडकडात शिक्षकेच्या कार्याचा गौरव करण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यामधून अत्यंत काटेकोर निवड प्रक्रिया द्वारे प्रत्येक तालुक्यातून केवळ एका शिक्षिकेचा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. भद्रावती तालुक्यातून अमृता जीवने यांनी आपल्या उत्कृष्ट अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांमधील शिस्त आणि शैक्षणिक मूल्यांची जोपासना तसेच राबवलेले नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रकल्प या जोरावर या पुरस्कारावर आपले नाव कोरले.

अमृता जीवने या केवळ वर्गातील अध्यापनापुरतेच मर्यादित न राहता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक कृती निर्माण करण्यासाठी तसेच सामाजिक जनजागृतीसाठी सतत कार्यरत असतात त्यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या आणि शैक्षणिक गुणवत्तेची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली. या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता पेंदाम, सहाय्यक शिक्षिका माया विद्ये, शिक्षिका चांदेकर, कु. वांदिले, शिक्षक निलगिलवार ,पती धीरज मजगवळी, शिक्षण विस्तार अधिकारी कु. सिद्धम शेट्टीवार, केंद्रप्रमुख विद्ये, जुनघरे मॅडम आदींसह भद्रावती परिसरातील नागरिकाकडून अमृता जीवने या शिक्षिकेवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या पुरस्कारामुळे तालुक्याच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये