ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोरपना येथे स्वातंत्र्य दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपणा-ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ कोरपणा द्वारा संचालित वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोरपणा येथे भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 76 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीधर रावजी गोडे साहेब यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळेस थोर पुरुष स्वातंत्र्य सेनानी यांच्या प्रतिमांचे पूजन करून वंदन करण्यात आले ध्वजारोहणानंतर तिरंग्याला सलामी देण्यात आली व राज्य गीत म्हणण्यात आले याप्रसंगी मान्यवरांनी शुभेच्छा संदेश सादर केले विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत व भाषणे सादर केले यावेळेस मेरे मिट्टी मेरा देश या या उपक्रमांतर्गत वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा व घोषवाक्य स्पर्धा विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेचे सचिव माननीय भाऊराव पाटील कारेकर संचालक नामदेव पाटील जोगी, पटेलजी, रमाकांत मालेकार, ए एन कुकडे, गणेश गोडे, अरविंद कारेकर सतीश झाडे, मुख्याध्यापक श्री डीजे खडसे पर्यवेक्षक पी बी बोंडे मान्यवर पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन पीबी बोंडेव एफ फंदाम यांनी केले श्री मने यांनी आभार प्रदर्शन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये