प्रलंबित मागण्यांसंदर्भात ग्राम रोजगार सेवकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. चंद्रपूर यांना दिले निवेदन
एकच सवाल तुटपुंज्या मानधनावर जगावे काय?

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) ग्रामसेवक हा अत्यल्प मानधनावर अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असतो. ग्रामपातळीवर मजुरांची नोंद ठेवणे, उपस्थिती ऑनलाईन कामकाज, योजना अंमलबजावणी, तसेच शासनाच्या विविध योजनेचे प्रभावी नियंत्रण व प्रत्यक्ष अंमलबजावणी यात ग्राम रोजगार सेवकांचे योगदान विशेष असते.
मात्र मागील अठरा महिन्यापासून त्यांचे मानधन प्रलंबित असल्याने आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे.
प्रलंबित मानधन व इतर कर्मचाऱ्याप्रमाणे मूलभूत सुविधा व संरक्षण, कामाच्या स्वरूपानुसार टॅब , इंटरनेट आदी साधने देण्यात यावी याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले.
प्रकरणाचे गांभीर्य ओळखुन समस्यपूर्ती न केल्यासदिनांक १३ एप्रिल रोजी लोकशाही मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. निवेदन सादर करतेवेळी अध्यक्ष लक्ष्मण गव्हारे, उपाध्यक्ष मनोज मुत्यालवार, अनिल कोयचाडे, मनोहर बोरकुटे, रविंद्र जाधव, बाबुराव कुचणकर, प्रसिद्धी प्रमुख राजू बोरकर आदी सह अनेक ग्राम रोजगार सेवक उपस्थित होते.



