पेंढरी मक्ता येथील शिक्षकाची प्रतिनियुक्ती रद्द करा – शाळा व्यवस्थापन समितीची मागणी
प्रतिनियुक्ती रद्द न झाल्यास आंदोलनाचा इशारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
जिल्हा परिषद शाळा येथे विद्यार्थी पटसंख्येनुसार शिक्षक नसतांना तेथील एका शिक्षकाची प्रतिनियुक्ती आदेश काढल्याने शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकाऱ्यांनी माजी सभापती विजय कोरेवार यांचे नेतृत्वात प्रतिनियुक्ती आदेश रद्द करण्याची मागणी केली. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पेंढरी मक्ता येथे १ ते ७ वर्ग असून ११५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मोठ्या प्रमाणात विदयार्थी संख्या असून ५ शिक्षक कार्यरत असतांना तेथूनच श्री. लेनगुरे शिक्षकांची प्रतिनियुक्तीवर बदली करण्याचा आदेश गटशिक्षणाधिकारी यांनी काढला आहे. या आदेशामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र घोडाम, लखन मेश्राम, अश्विनी प्रविण गेडाम, मंगेश दामोधर भोयर,चंदू देविदास आवळे, किरण संतोष गावडे, सुष्मा किशोर कस्तुरे, भारती राजेंद्र गेडाम, रेखा विलास मडावी, विद्या संजय जराते, विजय विश्वनाथ गावडे, देविदास बालाजी आवळे, यादी शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी व पालक यांनी माजी सभापती विजय कोरेवार यांचे नेतृत्वात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मुक्तेश्वर कोमलवार यांची भेट घेत चर्चा केली. प्रतिनियुक्ती रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी दिला.



