लाठी काठीने मारहाण महिलेसह चार जणावर गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा : ‘तू माझे नाव का घेत आहे?” या किरकोळ कारणावरून फिर्यादी महिलेच्या पतीला शिवीगाळ करून काठीने मारहाण केल्याप्रकरणी आरोपी महिलेसह चार जणांवर गून्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना देऊळगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत गिरोली बु. येथे 7 मार्च रोजी घडली.
पोलीस सूत्रानुसार, फिर्यादी सो. अर्चना रवीद्र झिनेव त्यांचे पती रींद्र झिने हे आपल्या मुली व नातीशी बोलत असताना त्यांच्या घराबाहेर आरोपी सौ.अनिता भीमराव झिने हीने येऊन ‘तू माझे नाव का घेत आहे?”असे म्हणून शिवीगाळ केली. दरम्यान आरोपी भीमराव अहिल्या झिने यांनी काठीने फिर्यादीचे पती यांना मारहाण करून जखमी केले. तसेच आरोपी गणेश भीमराव झिंने, गौरव भीमराव झिने यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जीव मारण्याची धमकी दिली.
अशा 8 मार्च रोजीच्या तक्रारीवरून ‘देऊळगाव राजा पोलिसांनी आरोपी सौ. अनिता भीमराव झिने,भीमराव अहिल्या झिने,गणेश भीमराव झिने, गौरव भीमराव झिने सर्व रा. गिरोली बु.ता.देऊळगाव राजा यांच्याविरुद्ध कलम 118 (2), 352,351(2),351(3),3 (5) बिएनएस नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय गोरे करीत आहेत



