ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ट्रॅक्टर आणि दुचाकीचा भीषण अपघात : भद्रावती येथील एक युवक एक ठार तर एक गंभीर जखमी

शेगाव मधील पद्मावार राईस मिल जवळील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        आज सकाळी दहाच्या सुमारास वरोरा वरून चिमूर कडे जाताना शेगावच्या आधी असलेल्या पद्मावार राईस मिल जवळ एका दुचाकी क्र. एम.एच.३४ बी.एस. १८८७ व विना नंबर ट्रॅक्टर ट्रॉली यांचा अपघात होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा अत्यंत गंभीर जखमी झाल्याने यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्त स्त्राव होऊन एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

          सविस्तर वृत्त असे की महालगाव येथील नंबर नसलेले महिंद्रा कंपनीचे अर्जुन ट्रॅक्टरवर व ट्रॉली ही राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वरून पद्मावर राईस मिल कडे वळण घेत असताना दोन युवक विना दुचाकीने येत होते. प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यावरून दुचाकी अतिशय वेगात असल्याकारणाने ट्रॅक्टरने एकाएकी वळण घेता ट्रॅक्टर वर येऊन अदळाली अपघात एवढा भीषण होता की दुचाकीची खोपडी, नंबर प्लेट तुटली व दुचाकी ट्रॅक्टर च्या समोरील चाकाच्या मागे फसली या मद्ये एका युवकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा युवक गंभीर रित्या जखमी झाले. शेगाव पोलिसांनी मोक्का पंचनामा केला असून ट्रॅक्टर मुनके विना नंबर व ट्रॉली विना नंबर स्वप्नील बदकी यांच्या महालगाव यांच्या मालकीचे पोलीस स्टेशन येथे जमा केले असून. दुचाकी वरील मृत पावलेला स्वामी मलय्या यमलु वय ३४ वर्ष व गंभीर रित्या जखमी असलेला संतोष राजू पवार वय १८ वर्ष दोन्ही राहणार भद्रावती असे दोघांचे नाव आहे. युवकांना वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आले असून यातील स्वामी मलय्या यमलु यांना डॉक्टर यांनी मृत घोषित केले तर संतोष पवार ला जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.

या अपघातामुळे परत एकदा शेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे. जर शेगावचे प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्णपणे कार्यान्वित असते तर जखमींना वरोरा येथे हलवण्याची वेळ आली नसती व वेळेवर उपचार मिळाल्यामुळे कदाचित मृताचे प्राण वाचले असते.

तसेच शेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर दुचाकी व चार चाकी यांच्यावर नंबर प्लेट न लावता गाड्या चालवण्याची फॅड वाढलेली आहे. अवैध रेती वाहतूक करणाऱ्या एकाही ट्रॅक्टर व ट्रॉलीवर नंबर टाकलेला नाही. परंतु परिवहन विभाग याकडे कुठे जाणीवपूर्वक काना डोळा करीत रत नाही ना असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये