ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवाजी पुतळ्यामागील जागा खुल्या मैदानासाठी राखीव ठेवण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभुर्णा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामागील मोकळी जागा खुल्या मैदानाच्या स्वरूपात ठेवण्यात यावी तसेच त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसाठी सुसज्ज उद्यान विकसित करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे.

सदर जागा सध्या मोकळी असून, शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे नागरिकांना फिरण्यासाठी, व्यायामासाठी तसेच मुलांना खेळण्यासाठी सुरक्षित जागेची कमतरता भासत आहे. त्यामुळे या जागेचा सुयोग्य वापर करून येथे हरित उद्यान, चालण्याचा ट्रॅक, बसण्याची सोय आणि मुलांसाठी खेळणी बसवण्यात यावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी सकाळ-संध्याकाळ फिरण्याची व बसून वेळ घालवण्याची सोय उपलब्ध झाल्यास त्यांच्या आरोग्यासही फायदा होईल. तसेच मुलांना खेळण्यासाठी सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण मिळेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

नगरपंचायत प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन लवकरात लवकर या ठिकाणी उद्यान उभारणीचा निर्णय घ्यावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये