तिरुपती नगरमध्ये सांडपाणी उघड्यावर साचत असल्याने नागरिक त्रस्त
नगर परिषदने लक्ष द्यावे ; त्रस्त असलेल्या नागरिकांनी नगर परिषदला दिले निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
चिखली रोडवर असलेल्या प्रभाग 3 मधील तिरुपती नगर येथील नागरिकांना खुल्या जागेत साचलेल्या सांडपाण्याचा अतोनात त्रास होत असून आरोग्याला धोका निर्माण झाला असून, नगर परिषद ने या प्रकरणी लक्ष वेधून सांडपाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी तिरुपती नगर येथील नागरिकांनी नगर परिषद कडे निवेदन देऊन केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, तिरुपती अपार्टमेंट येथील 16 फ्लॅट चे सांडपाणी व मैलापाणी योग्य ड्रेनेज नसल्याने खुल्या जागेत उघड्यावर साचत असल्याने परिसरातील नागरिकांना त्रास होत असून आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, सांडपाणी उघड्यावर साचत असल्याने दुर्गंधी सुटली आहे डासांचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. यामुळे डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे, डुकरांचा संचार सुद्धा वाढला आहे.
लहान मुले, जेष्ठ नागरिकांना याचा त्रास होत असून आरोग्याला धोका निर्माण झाला आहे,या गंभीर समस्येवर तातडीने तोडगा काढून सांडपाणी ची विल्हेवाट करावी अशी मागणी तिरुपती नगर येथील नागरिक जगदीश डोईफोडे, शरद डोईफोडे, अशोक काळुसे, संतोष मान्टे , सिद्धेश्वर डोईफोडे यांनी केली आहे,


