ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बाल प्रबोधनकार शिफा पवार नेताजी सुभाषचंद्र बोस पुरस्काराने लातूर येथे सन्मानित

महाराष्ट्र पोलीस मित्र सोशल असोसिएशन महाराष्ट्र राज्य आयोजित भव्य पुरस्कार सोहळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

    स्थानिक चंडिका वार्ड येथील बाल प्रबोधनकार शिफा पवार हिला ‘नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’ देऊन लातूर येथे सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र पोलीस मित्र सोशल असोसिएशन (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला.

अल्पवयातच समाजप्रबोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिफा पवार हिने विविध सामाजिक विषयांवर जनजागृती करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन तिला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. डॉक्टर, शिक्षक, समाजसेवक, पत्रकार तसेच अनेक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.

शिफा पवार हिच्या या यशाबद्दल भद्रावती परिसरात आनंदाचे वातावरण असून, विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये