ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी,ठार, गावकऱ्यात भीतीचे वातावरण

मक्का पिकामुळे वाघाचे, पिल्हासह वास्तव्य, वन विभाग सज्ज

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

ब्रम्हपुरी वनविभागात येत असलेल्या नागभिड प्रादेशिक वन क्षेत्रातील, मीडाला बिटातील मिठूर येथील शेतकरी हरिदास महादेव कुबडे वय ५८ वर्ष हा ४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता मोहफुल वेचण्यासाठी शेतशिवारात गेला असता सायंकाळी परत न आल्याने पत्नी कांताबाई याने आपले पुतणे अक्षय याला तुझे मोठे बाबा आज घरी आले नाही यामुळे तू शेताकडे जा आणि शोध घेऊन ये असे सांगितले असता अक्षय शोध घेत असताना त्याला चार वाघ दिसले असता घाबरून परत आला आणि त्याने घडलेली घटना कथन केल्याने पोलिस स्टेशन व वन विभाग नागभिड येथे तक्रार देण्यात आली.

वन विभागाचे पथक व पोलिस बंदोबस्तात रात्री १० वाजेपर्यंत शोध घेत रात्री कॅमेरे बसवून शोध घेतला असता वाघाचे दर्शन कॅमेऱ्यात कैद झाले असून शोध मोहीम सुरू केली असता मका शेतात वाघाने दबा धरून वाघाने हल्ला करून ठार केले असे उघड झाले. वन विभागाने पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करून शवविच्छेदन करीत प्रेत नातेवाईक यांचेकडे देत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी वनविभागाचे वतीने सानुग्रह अनुदान देण्यात आले.

मका व भात पिकामुळे वन्य प्राणी शेतशिवारात येत असून मोहफुलाचा हंगाम असल्याने ग्रामीण भागातील जनता मोहफुले वेचण्यासाठी जात असले तरी मका पिकात दबा दारुण नसल्याने हा प्रकार घडला असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने जंगलात जाताना योग्य काळजी घ्यावी यासाठी मार्गदर्शन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये