ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर महानगरातर्फे मतदार यादी सखोल फेरतपासणी अभियानाबाबत बैठक

मतदार याद्यांतील त्रुटी दूर करून त्या अद्ययावत करण्याच्या सुचना

चांदा ब्लास्ट

 भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरतर्फे मतदार यादी विशेष सखोल फेरतपासणी अभियानाच्या पार्श्वभूमीवर महानगर कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभियानाच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

            या बैठकीदरम्यान मतदार याद्यांतील त्रुटी दूर करून त्या अद्ययावत करणे, नवीन मतदारांची नोंदणी करणे तसेच मतदान प्रक्रियेत होणार्या गडबडी टाळणे या उद्दिष्टांवर भर देण्यात आला. कार्यकर्त्यांनी प्रत्येक बूथस्तरावर जाऊन मतदार यादी तपासणीचे काम काटेकोरपणे पार पाडावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

  यावेळी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष मा. श्री. हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार तथा भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांची प्रमूख उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना हंसराज अहिर म्हणाले कि, मतदार यादी ही लोकशाहीची मूलभूत कडी आहे. जर मतदार यादीतच त्रुटी राहिल्या, तर लोकशाही प्रक्रियेला बाधा येऊ शकते. त्यामुळे एसआरआय अभियान अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून घराघरात जाऊन मतदारांची माहिती पडताळावी.

  कोणताही पात्र मतदार वंचित राहू नये आणि कोणत्याही अपात्र व्यक्तीची नोंद यादीत राहू नये, यासाठी काटेकोरपणे काम करणे आवश्यक आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेहमीच शिस्तबद्ध आणि जबाबदारीने काम करतात, याची मला खात्री आहे. हे अभियान यशस्वी करून आपण लोकशाही अधिक बळकट करू असे ते यावेळी म्हणाले.

            तर यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, मतदार यादी सखोल फेरतपासणी अभियान हे केवळ एक प्रशासनिक काम नसून लोकशाही सुदृढ करण्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्रत्येक मतदाराचा हक्क सुरक्षित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

  आपल्या भागातील एकही पात्र मतदार वंचित राहू नये, यासाठी कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन माहिती तपासावी. तसेच चुकीची नोंद, मृत व्यक्तींची नावे किंवा स्थलांतरित मतदारांची माहिती दुरुस्त करणे अत्यंत गरजेचे आहे.

  भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेहमीच जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात. या अभियानातही आपण तितक्याच निष्ठेने काम करून चंद्रपूर महानगरातील मतदार यादी अचूक आणि पारदर्शक बनवाल असा विश्वास आहे. हे अभियान यशस्वी करून लोकशाहीला अधिक बळकट करण्याचा संकल्प आपण सर्वांनी करण्याचे आवाहण यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. या बैठकीला एसआरआय प्रमूख, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, नगर सेवक, शक्तीकेंद्र प्रमुख आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये