वन्यप्राणी बिबट अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत अवस्थेत आढळला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 04/04/2026 रोजी सहवनक्षेत्र वर्धा अंतर्गत येणाऱ्या नियतक्षेत्र आंजी बिटातील मौजा दिग्रस जवळ समुध्दी हायवेवर येथे वन्यप्राणी बिबट अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यु झाल्याची माहिती QRV व्हेईकल टीम अग्निशामक दल यांनी मा. वनपरिक्षेत्र अधिकारी वर्धा यांना माहिती दिली असता सदर घटना स्थळावर तात्काळ हजर झालो असता, चायनल क्रमांक 64/800 मध्य लाईनवर मृत अवस्थेत आढळून आला.
मौका पाहणी करुन NTCA च्या गाइडलाइन चे तंतोतंत पालन करुन मौका पंचनामा नोंदवून, सदर प्रकरणी वनगुन्हा जारी केला. त्यानंतर सदर बिबटचे दिनांक 05/04/2026 रोजी सकाळी वपपरिक्षेत्र कार्यालय परिसरात पशुवैदयकीय अधिकारी वर्धा यांच्या चमुनी NTCA च्या गाइडलाइन प्रमाणे शवविच्छेदन करुन मृत बिबटचे नमुने तपासणी करीता घेण्यात आले. सदर शवविच्छेदन दरम्यान मा. सहायक वनसंरक्षक एम के आडे, मा. तसेच कु. व्ही एस भलावी वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा, श्री कौशलजी मिश्रा मानद वन्यजीव रक्षक वर्धा, श्री आशिष गोसामी NTCA सदस्य, श्री. अभिषेख खेडुलकर NGO तसेच पशुवैदयकीय अधिकारी डॉ. व्ही डी मडावी, डॉ प्रणिता पानतावणे, डॉ हर्षा अंधारे, पिपल फॉर अॅनीमल मधील डॉ. अक्षय गिरी यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन पुर्ण करुन NTCA च्या गाइडलाइन नुसार मृत बिबटचे अग्नी दहन करण्यात आले.
घटनेचा अधिकचा तपास मा. हरविर सिंग उपवनसंरक्षक वर्धा, व मा. एच एस सरोदे सहायक वनसंरक्षक तेदू व वन्यजीव वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली सदर घटनेचा तपास कु. व्ही एस भलावी वनपरिक्षेत्र अधिकारी वर्धा, श्री ए एल जाधव क्षेत्रसहायक वर्धा, वनरक्षक श्री. एम एस माने श्री ए जे गिते, श्री एस सी ताबंडे, करीत आहेत.



