ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सरदार पटेल महाविद्यालयात, चंद्रपूर – पालक-शिक्षक सभेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ येथील सरदार पटेल महाविद्यालयात दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पालक-शिक्षक सभा ऑनलाईन पद्धतीने उत्साहात पार पडली. या सभेला सुमारे ५० पालकांनी सहभाग नोंदविला तसेच सर्व प्राध्यापकवृंद उपस्थित होते. एकूण सुमारे १५० सहभागी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

कार्यक्रमाची सुरुवात पालक-शिक्षक समितीच्या प्रभारी डॉ. वैशाली थूल यांच्या प्रास्ताविकाने झाली. उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. माधमशेट्टीवार सर यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत मार्गदर्शन केले.

या सभेचे मुख्य आकर्षण म्हणून मानसशास्त्रज्ञ डॉ. डी. पी. बनकर (चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात Psychological Counsellor ) यांनी विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, तणाव व्यवस्थापन, व्यसनाधीनता व पालकांची भूमिका या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या व्याख्यानाला पालकांनी उत्तम प्रतिसाद दिला.

सभेदरम्यान पालक संवाद सत्रात श्री. सुनील येर्ने व सौ. योगिता नेवारे यांनी आपले विचार मांडून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

त्यानंतर प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांनी पालकांच्या प्रश्नांना उत्तरे देत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक व शिक्षक यांच्यातील सातत्यपूर्ण संवाद आणि सहकार्य अत्यंत आवश्यक असल्याचे अधोरेखित केले. तसेच विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य, शिस्त, अभ्यासाची सवय आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यामध्ये पालकांची भूमिका किती महत्त्वाची आहे यावर त्यांनी विशेष भर दिला. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे पालकांना आपल्या पाल्यांच्या प्रगतीसाठी योग्य दिशा मिळाली. सभेचा समारोप डॉ. वर्षा ठाकरे यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.

सभेचा समारोप डॉ. वर्षा ठाकरे यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.

ही पालक-शिक्षक सभा यशस्वीरीत्या पार पडून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच मानसिक विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली.

दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव कीर्तिवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळचे कार्यकारी सदस्य राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, जीनेश पटेल यांनी शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये