ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चांदा ज्योती सुपर-100 मध्ये चमकली महात्मा गांधी विद्यालय सोनुर्ली ची पूनम अंगद मोरे

तालुक्यातील एकमेव शाळेचे सुयश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने राबविलेल्या चांदा ज्योती सुपर-१०० या विशेष शैक्षणिक उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या चाळणी परिक्षेत महात्मा गांधी विद्यालय सोनुर्ली ची विदयार्थीनी यशस्वी होऊन या विद्यार्थिनी ला पुढील दोन वर्षाचे विशेष शिक्षण व प्रशिक्षण जि. प. तर्फे देण्यात येणार आहे. जि. प. शिक्षण विभागाने घेतलेल्या चाळणी परिक्षेत पूनम अंगद मोरे या विद्यार्थीनी ची निवड होणारी कोरपना तालुक्यातील सोनुर्ली येथील महात्मा गांधी विद्यालय ही एकमेव शाळा आहे हे विशेष. निवड झालेल्या या विद्यार्थीनी ला जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे पुढील उच्च शिक्षणासाठी प्रशिक्षण देण्यात येणार असून अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणाची दारे सुरू करण्यात येणार आहेत. पात्र ठरलेल्या विदयार्थी निवासासाठी संपूर्ण खर्च शिक्षण विभाग करणार आहे.

       चांदा ज्योती सुपर-१०० हा शैक्षणिक उपक्रम १० वी तील वहुशार अनुसूचित जाती, जमाती तील विदयार्थी यांचेकरीता राबविण्यात आलेला आहे. पात्र उमेदवार निवडीकरीता चाळणी परिक्षा राबविण्यात आली व यात महात्मा गांधी विद्यालय सोनुर्ली येथील पूनम अंगद मोरे ही विदयार्थीनी पात्र ठरली असून तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. पूनम चे गडचांदुर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदुर चे अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, संस्थेचे सचिव धनंजय गोरे, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक बबन भोयर यांचेसह सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये