नांदगाव येथे हनुमान जयंती उत्साहात साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
चंद्रपूर (पोभुर्णा) : मुल तालुक्यातील नांदगाव येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही ऑटो चालक-मालक काळी पिवळी वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने दि. २ एप्रिल रोजी संकटमोचन हनुमानजी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी हनुमान मंदिरात हनुमानजींच्या मूर्तीची विधिवत पूजा-अर्चा करून आशीर्वाद घेण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमस्थळी हनुमानजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी भक्तिमय वातावरणात कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमादरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा लाभ नांदगाव येथील नागरिक तसेच प्रवाशांनी मोठ्या संख्येने घेतला. सदर संघटनेतर्फे सामाजिक व धार्मिक उपक्रम सातत्याने राबविले जात असून, समाजहिताची वाटचाल सुरू असल्याचे यावेळी दिसून आले.
हनुमान जयंती उत्सवावेळी संघटनेचे अध्यक्ष सारंग पेदापलीवार, सचिव राकेश पाल तसेच पदाधिकारी गंगाधर वाटघरे, श्याम वाकुडकर, राजू पवार, भावेष कमलापुरीवार, संदीप भंडारे, बालाजी लोडेलीवार, अतुल चरडुके, महेश तेलंग, प्रमोद आलेवार, सुरज राऊत, विजय कलगडवार, सनम बोरेन, आकाश खोब्रागडे, कृष्णा मेश्राम, प्रविण मंडरे, पंकज फाले, समीर जाधव, दिवाकर झरकर, राजू वाकुडकर, कालीदास वाळके, भूषण पोटे, सोमनाथ जुनघरे, विनोद कोरेकार, राजेंद्र पोरेडीवार, आकाश गवळेवार आदी उपस्थित होते.



