ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी जाणून घेतल्या आयसीआरपीच्या समस्या

आयसीआरपीच्या मागण्यांचा पाठपुरावा करणार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : महिला समुदाय संशोधन व्यक्तींचे (आयसीआरपी) मानधन वाढ व विविध मागण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी बैठक घेतली. आयसीआरपीच्या विविध समस्या व मागण्यासांठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करू, असे यावेळी महिलांशी चर्चा करतांना पालकमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी, अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली, आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी गितांजली निकम, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त अंकेश केदार, संजय गांधी निराधार योजना वर्धा तालुका समितीचे अध्यक्ष आशिष कुचेवार आदी उपस्थित होते.

शासनस्तरावर प्रयत्न करुन आयसीआरपीच्या महिलांचे मानधन वाढ करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल. आयसीआरपीच्या महिलांनी बचत गटाची निर्मिती करावी. गट सक्रीय कार्यरत ठेवावा आणि बचत गटातील महिला स्वत:च्या पायावर उभ्या कशा राहतील यासाठी प्रयत्न करावे, असे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी आयसीआरपीच्या महिलांशी संवाद साधतांना सांगितले.

समुदाय संशोधन व्यक्तीच्या मानधनात वाढ, ऑनलाईन कामासाठी मोबाईल व मोबाईल रिचार्ज देण्यात यावा, मानधन थेट खात्यात जमा करावे, ड्रेसकोर्ड व ओळखपत्र देण्यात यावे व प्रवास भत्ता देण्यात यावा इत्यादी मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजिन करण्यात आले होते. याविषयावर पालकमंत्र्यांनी संवाद साधत मागण्यांसदर्भात संबंधित विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

आयसीआरपीची नियुक्ती महिला बचत गटाशी समन्वय साधून त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी करण्यात आली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बचत गटाची चळवळ सुरु आहे. या गटांना सक्षम करण्यासोबतच त्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले. बैठकीला आरसीआरपीच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये