ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा नगरपरिषदेच्या कचरा डेपोत शिरून शासकीय मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

सावंगी मेघे पोलिसांची कडक कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा शहराच्या कचरा व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मौजा इंझापूर येथील कचरा डेपोमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करून शासकीय मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या अज्ञात आरोपींविरुद्ध सावंगी मेघे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगरपरिषद वर्धा अंतर्गत मौजा इंझापूर येथे कचरा डेपो असून, दिनांक २६/०३/२०२६ रोजी दुपारी २:०० वाजताच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी या डेपोमध्ये विनापरवाना प्रवेश केला. यावेळी आरोपींनी तेथील कचरा पेटवून दिला, ज्यामुळे शासकीय मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याप्रकरणी नगरपरिषद वर्धा चे मुख्याधिकारी यांच्या वतीने तक्रारदार अंकुश लक्ष्मण आडकिने यांनी सावंगी मेघे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती प्राप्त फिर्यादीवरून सावंगी मेघे पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपींविरुद्ध अपराध क्रमांक २३/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२४ (४) सह कलम ३ व ४ सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम-१९८४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनास्थळावारील cctv फुटेज व साक्षीदार यांचे मदतीने घटनेतील आरोपींचा शोध घेण्यात येत आहे तसेच आरोपी निष्पन्न करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

याद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, मौजा इंझापूर येथील कचरा डेपोमध्ये विनापरवानगी प्रवेश करणे कायद्याने गुन्हा आहे. कोणीही अशा प्रकारे शासकीय कामात अडथळा आणू नये किंवा मालमत्तेचे नुकसान करू नये. अशा प्रकारची कृत्ये करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर फौजदारी कारवाई करण्यात येईल.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, वर्धा, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा यांच्या मार्गदर्शनात सावंगी मेघे पोलीस ठाण्याचे स.पो.नि. पंकज वाघोडे, सहायक फौजदार शरद मुन, पो.शि. भूषण मसराम व पो. हवा. भागडकर यांनी केलेली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये