ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मतिमंद अल्पवयीन मुलीचा 9 वर्षानंतर शोध घेऊन गुन्हा उघडकीस

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

         विवरण याप्रमाणे आहे की, यातील फिर्यादीने पोलीस स्टेशन दहेगाव गोसावी येथे तोंडी रिपोर्ट दिला की, त्यांची मतिमंद अल्पवयीन मुलगी वय अंदाजे 15 वर्षे हिला कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावुन पळवून नेले. अशा फिर्यादी चे तक्रारीवरून दि 13/12/2017 ला पो. स्टे. दहेगाव गोसावी येथे अप क्र.162/2017 कलम 363 भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपासात घेतला. सदर गुन्हयातील मतिमंद मुलीचा शोध न लागल्याने सदरच्या गुन्हयात अ फायनल तयार करण्यात आले. सदरचे अ फायनल मा. कोर्ट सेलु यांचे कडुन मंजुर करून सदर चा गुन्हा कायम तपासावर ठेवण्यात आला होता.

         सदर गुन्ह्याचा तपासात मा. श्री सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक वर्धा यांनी दिलेल्या विशेष सूचना व निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा तथा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा यांचे मार्गदर्शनात पथक तयार करण्यात आले.

          सदर गुन्ह्यात खात्रीशीर मुखबिर लावून तपास करण्यात आला. त्या अनुषंगाने गुन्ह्यातील मतिमंद अल्पवयीन पिडीत मुली बाबत संपूर्ण माहिती संकलित करण्यात आली असता पिडीत मुलगी ही शेगाव येथून रेल्वेने वर्धेकरीता येत असल्याची गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाल्याने रेल्वे स्टेशन वर्धा येथे सापळा रचून गुन्हातील अल्पवयीन पीडित मुलगी ही वय 15 वर्षे हिला महिला पोलीस स्टॉप चे मदतीने ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पो. स्टे. दहेगाव गोसावी करीत आहे.

          सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी स्थानिक गुन्हे शाखा तथा, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा यांचे मार्गदर्शनात स.फौ. सुभाष राऊत, दिवाकर परिमल, नितेश मेश्राम, म.पो.हवा. अलका कुभंलवार, पो.शि. नवनाथ मुंडे, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये