ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बॅटरी चोरीचा गुन्हा उघड करुन बॅटरी चोरी करण्याऱ्या टोळीला केले जेलबंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनाक 17.03.2026 रोजी फिर्यादी नामे धमराज रामरावजी सुपारे, वय 61 वर्ष, रा. अल्लीपूर, ता. हिंगणघाट, जि. वर्धा यांनी पोलीस स्टेशन अल्लीपूर येथे येवुन तोंडी रिपोर्ट दिलीक की, फिर्यादी व इतर तिन लोकांचे असे एकुण 4 ट्रॅक्टर च्या बॅटऱ्या कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी करुन नेल्याचे तकारी वरून पोलीस स्टेशन अल्लीपूर येथे अप कमांक 0099/2026 कलम 303 (2) बि.एन.एस अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन तपासावर आहे.

सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा करीत असतांना प्राप्त तांत्रिक माहितीचे आधारे गुन्हयातील आरोपी व चोरीस गेलेल्या मुदद्देमालाचा शोध कामी वर्धा (शहर) परीसरात पेट्रोलींग करीत असता, मुखबिर कडुन खात्रीशीर खबर मिळाली की, सदर गुन्हा हा रोषन उर्फ गोलु वैद्य, रा. कृष्णनगर, वर्धा याने त्याचे साथीदारासह केला असुन सदर बॅटऱ्या ह्या रेल्वे स्टेशन रोडवर गोल भाजी मार्केट जवळ आलेल्या आई अंबे पान सेंटर पानठेल्या मध्ये ठेवुन आहे. अशा माहिती वरुन स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा चे पथक रेल्वे स्टेशन रोडवर गोल भाजी मार्केट जवळ असलेल्या आई आंबे पान सेंटर जवळ गेले असता नमुद पानठेल्याचे समोर पाच इसम उभे दिसले. स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा चे पथकाने सापळा रचुन मोठ्या शितापिने 1) रोषन उर्फ गोलु नरेशराव वैद्य, वय 26 वर्ष, रा. जुन्या आयकर भवन जवळ, कृष्णनगर, वर्धा, 2) हर्षल विलास पुरी, वय 19 वर्ष, रा. पोद्दार बगीचा, रामनगर, वर्धा व तिन विधी संघर्षीत बालक यांना ताब्यात घेवुन त्यांनी सदर गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना गुन्हया संबंधाने विचारपूस केली असता त्यांनी पो.स्टे. अल्लीपूर अंतर्गत दिनांक 16.03.2026 ते 17.03.2026 चे रात्र दरम्यान आरोपी व विधीसंघर्षीत बालक यांचे जवळ असलेल्या मोपेड गाडीचे सहाय्याने बॅटऱ्या चोरी केल्याचे कबुल केले असुन आई अंबे पान सेंटर पानठेल्यामध्ये ठेवुन असल्याचे सांगीतल्याने आई अंबे पान सेंटर पानठेल्याची पाहणी केली असता पानठेल्यामध्ये चार अॅमरॉन कंपणीच्या बॅटऱ्या ठेवुन असलेल्या दिसुन आल्या. आरोपी व विधी संघर्षीत बालक यांना गुन्हा करतेवेळी वापरलेल्या मोपेड गाड्‌याबाबत विचारणा केली असता पानठेल्या समोर ठेवुन असलेल्या तिन्ही मोपेड गाड्यांनेच अल्लीपूर येथे जावुन चोरी केल्याचे सांगीतले वरुन दोन्ही आरोपी व तिन्ही विधीसंघर्षीत बालक यांचे ताब्यातुन गुन्हयातील चोरी गेलेल्या 1) काळ्या रंगाच्या जुन्या वापरत्या अॅमरॉन कंपणीच्या एकुण 04 बॅट-या प्रती बॅटरी 6,000/- रू प्रमाणे 24,000/- रु. व गुन्हयात वापरलेल्या मोपेड 2) एक जुन्या वापरत्या दोन लाल रंगाच्या प्लेझर मोपेड गाडी क्रमांक एम.एच. 32 आर. 0353 व एम.एच. 32 झेड 1453 व एक एक जुनी वापरती काळ्या रंगाची डिओ मोपेड गाडी क्रमांक एच एच 14 एफ.एल 2928 किमंत 1,20,000/- रु. तसेच 05 मोबाईल किमंत 90,000/- रु. असा एकुण जु.कि. 2,34,000/- रु. चा माल सदर गुन्हयाचे पुराव्या कामी पंचासमक्ष मौकाजप्ती पंचनाम्या प्रमाणे जप्त केला. सदर दोन्ही आरोपीतांना पोलीस स्टेशन अल्लीपूर यांचे ताब्यात देण्यात आले असुन विधी संघर्षीत बालक यांना उदईक रोजी तपासी अधिकारी यांचे समक्ष हजर राहण्याबाबत सुचनापत्र देण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस स्टेशन अल्लीपूर करीत आहे.

सदरची महत्वपुर्ण कारवाई मा. श्री. सौरभकुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक वर्धा, मा. श्री. सदाशिव वाघमारे, अपर पोलीस अधिक्षक, यांचे मार्गदर्शन व निर्देशाप्रमाणे श्री. विनोद चौधरी, पोलिस निरीक्षक, पो. उपनि. प्रकाश लसुंते, स.फौ. मनोज धात्रक, पो.हवा. हमीद शेख, महादेव सानप, दिनेश बोथकर, अक्षय राऊत, पो.कॉ. विनोद कापसे, सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये