ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गौरव समारंभ : वरिष्ठ नागरिक महासंघातर्फे काशीराम मनगटे यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती :_ अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघ ,नेरूल पश्चिम मुंबई यांच्या वतीने आयोजित गौरव समारंभात चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील ज्येष्ठ समाजसेवक काशीराम मनगटे यांचा सत्कार करण्यात आला.

  मनगटे हे वरिष्ठ नागरिक महासंघाच्या अंतर्गत उल्लेखनीय कार्य करीत असून, त्यांनी आपल्या परिसरात वरिष्ठ नागरिक संघाचे प्रभावीपणे संघटन केले आहे. भद्रावती येथे त्यांनी स्थापन केलेले ‘विरंगुळा केंद्र’ हे वरिष्ठ नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

तसेच अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघात त्यांनी चार नवीन सदस्य नोंदणी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महासंघाचे अध्यक्ष मा. एम. के. रैना यांच्या हस्ते मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व पदक देऊन गौरविण्यात आले.

चंद्रपूर जिल्ह्यातून अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघात काशीराम मनगटे हे एकमेव सक्रिय सभासद असून, त्यांच्या कार्यामुळे जिल्ह्याच्या दृष्टीने हा अभिमानाचा विषय ठरत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये