ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांना यश

हनुमान खिडकी येथे झरपट नदीवरील पुलासाठी सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हनुमान खिडकी परिसरातील झरपट नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

पूर आणि सततच्या पावसामुळे सदर पूल क्षतिग्रस्त झाला होता. परिणामी, येथील रहदारीला मोठा अडथळा निर्माण झाला होता. अनेक दिवसांपासून वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.हनुमान खिडकी येथील झरपट नदीवरील पूल सतत येणाऱ्या पुरामुळे शातीग्रस्त झाला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद पडली होती. यामुळे स्थानिक नागरिकांनी नवीन पूल उभारण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला.

या पाठपुराव्याला यश मिळत अखेर पुलाच्या बांधकामासाठी सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या पुलाच्या उभारणीमुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था सुलभ होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

विशेषतः विद्यार्थ्यांपासून शेतकरी, व्यापारी आणि कामगार वर्गाला या पुलाचा मोठा फायदा होणार आहे. झरपट नदीवरील पुलामुळे वाहतूक सुरळीत होऊन नागरिकांचा वेळ आणि त्रास दोन्ही वाचणार आहेत.

यासंदर्भात आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, “या कामासाठी सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला असून, लवकरात लवकर कामाला सुरुवात करून ते वेळेत पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अशा पायाभूत सुविधा उभारण्यावर माझा कायम भर राहील असे म्हटले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये