ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

काँग्रेस पक्षाचे नेते संदीप शेळके यांचा संवाद दौरा

आज देऊळगाव राजा येथे बैठक 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

बुलढाणा जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने युवा नेते संदीप शेळके यांनी संपूर्ण जिल्ह्यात तालुका च्या ठिकाणी संवाद दौरा आयोजित केला आहे,

देऊळगाव राजा येथे 25 मार्च रोजी दुपारी दोन वाजता शासकीय विश्राम गृह येथे काँग्रेस पक्षाची तालुका बैठक आयोजित करण्यात आली आहे,

काँग्रेस पक्षामध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी व सध्याच्या परिस्थितीत काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी संवाद दौरा आयोजित करण्यात आला आहे, काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे युवक, बेरोजगार, महिला, सेवानिवृत्त अधिकारी,कर्मचारी,जेष्ठ नागरिक, व्यापारी, उद्योजक, यांनी हजर रहावे असे आवाहन काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते अनिल भाऊ सावजी यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये