ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुरुवर्य धुंडीराज महाराज पुण्यतिथी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

प.पू धुंडीराज महाराज कवीश्वर यांचा ४८ वा पुण्यतिथी सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.यानिमित्त त्रिदिवसीय अखंड हरिनाम सप्ताह व किर्तन महोत्सव संपन्न झाला. श्री धुंडीराज महाराज मूर्तीचे विधिवत पूजन अभिषेक व महाआरती करण्यात आली . महाप्रसादाने पुण्यतिथी सोहळ्याची सांगता झाली.

       शहरातील धुंडीराज महाराज उपासना धाम येथे व पु श्री गुरुवर्य धुंडीराज महाराज कवीश्वर यांचा ४८ व्या पुण्यतिथी निमित्त दिनांक 20 मार्च ते 22 मार्च 2026 त्रिदिवसिय अखंड हरिनाम सप्ताह व किर्तन महोत्सव संपन्न झाला,या सोहळ्यात श्री गजानन विजय ग्रंथ सामूहिक पारायण भावार्थरामायण प्रवचन हरिपाठ हरिकीर्तन व विविध अनुष्ठान व धार्मिक विधी संपन्न झाले .श्री धुंडीराज महाराज यांच्या मूर्तीचे ब्राह्मण वृद्धांच्या उपस्थितीत विधीवत मंत्रोच्चाराच्या गजरात अभिषेक पूजन व महाआरती करण्यात आली.

      हरी कीर्तनामध्ये ह भ प गणेश महाराज घुगे ह भ प डॉक्टर भगवान बाबा आनंदगडकर व काल्याचे किर्तन ह भ प संत चरणदास निकम महाराज गुरुजी यांचे संपन्न झाले या सोहळ्यात पंचकोशीतील वारकरी टाळकरी भजनी मंडळ सेवेकरी मंदिराचे संचालक मंडळ व भक्त मंडळ आदींची उपस्थिती होती. हजारो भक्तांनी या सोहळ्यामध्ये महाप्रसादाचा लाभ घेतला व पुण्यतिथी सोहळ्याची सांगता झाली.

     श्री धुंडीराज महाराज कवीश्वर उत्सव समितीच्या वतीने श्री धोंडीराज महाराज कवीश्वर यांचा ४८ वा पुण्यतिथी सोहळाचे आयोजन करण्यात आले होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये