ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपुर वनविभागातील सावली परिक्षेत्रा अंतर्गत उपक्षेत्र पाथरी येथील वाघाचा मृत्यु

चार संशयितांना घेतले ताब्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

चंद्रपुर वनविभाग, चंद्रपुर अंतर्गत परिक्षेत्र सावली, उपक्षेत्र व नियतक्षेत्र पाथरी मधील वन कक्ष क्रमाक 298 राखीव वन मधिल दिनांक 23.03.2026 रोजी वाघाच्या शरिराचे काही अवयव कुजलेल्या अवस्थेत असल्याची व त्यातील काही अवयव काढुन ठेवल्या संदर्भात तक्रार प्राप्त झाल्यावर वनविभागाने तात्काळ दखल घेत क्षेत्राची पाहणी केली असता दुपारी सुमारे 12.00 वाजता मृत वाघाचे काही अवयव कुजलेल्या अवस्थेत असल्याचे दिसुन आले.

 त्यातील काही अवयव घटनास्थळावरुन गहाळ असल्याचे दिसुन आले. त्यानुसार प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला असुन चंद्रपुर वनवृत्त, चंद्रपुर चे मा. मुख्य वनसंरक्षक श्री. आर.एम.रामानुजम (भावसे) यांच्या मार्गदर्शनात विभागीय वनअधिकारी, चंद्रपुर वनविभाग, चंद्रपुर श्री. राजन तलमले यांचे नेतृत्वात सहाय्यक वनसंरक्षक (तेंदु) चंद्रपुर वनविभाग, चंद्रपुर श्री. वि.एस.तरसे, व वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) सावली श्री. विनोद सी. धुर्वे, यांचे चम्मु पुढील तपास करित आहे.

प्राथमिक चौकशी नंतर चार संशयीत आरोपींना ताब्यात घेण्यात आले असुन, मा. न्यायालय प्रथम श्रेणी-1, सावली यांनी दिनांक 24/03/2026 रोजी तिन दिवसाची वनकोठडी सुनावली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सुरु असुन सविस्तर अहवाल प्रसिदध करण्यात येईल. गुन्हे तपासकामी श्री. बंडु धोतरे NTCA प्रतिनिधी व श्री. मुकेश भांदकक्कर व श्री. उमेशसिह झिरे, WPSI प्रतिनीधी तसेच परिविक्षाधिन वनपरिक्षेत्र अधिकारी, श्री. दत्ता जाधव यांचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये