ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोंडपिपरीत प्रभू श्रीराम जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी येथील स्थानिक श्री राम मंदिर देवस्थानतर्फे प्रभू श्रीराम नवमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने समस्त हिंदू समाजाला मोठ्या उत्साहात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यक्रमांची सुरुवात २६ मार्च २०२६ रोजी गुरुवारी सकाळी ८.०० वाजता घटस्थापना व गुढीपाडव्याच्या पावन पर्वानिमित्त भजन कार्यक्रमाने होणार आहे. जय बजरंग भजन तथा जय मल्हार गोंधळ मंडळ, चेक दरूर (ता. गोंडपिपरी) यांच्या वतीने जागरण कार्यक्रम सादर केला जाणार आहे.

त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी ४.०० वाजता शहरातील मुख्य मार्गांवरून प्रभू श्रीरामांच्या भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोभायात्रेत राम भक्तांचा मोठ्या संख्येने सहभाग अपेक्षित असून, पारंपरिक वाद्ये, झांज-पथक, ढोल-ताशा आणि आकर्षक देखावे यामुळे वातावरण भक्तिमय होणार आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी २७ मार्च २०२६ रोजी शुक्रवारी सायंकाळी ६.०० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, सर्व भक्तांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आयोजकांनी नमूद केले आहे.

या संपूर्ण कार्यक्रमात शिस्त व वेळेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले असून, गोंडपिपरीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सव यशस्वी करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये