ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रम्हपुरीत ‘साई उत्सवा’चा जल्लोष! २५ मार्चपासून विविध धार्मिक कार्यक्रमांची मांदियाळी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

      शहरातील विद्यानगर येथील साई मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही २५ ते २७ मार्च या कालावधीत भव्य ‘साई उत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. भक्ती आणि उत्साहाच्या या सोहळ्यात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार असून, संपूर्ण ब्रम्हपुरी शहर साईमय होणार आहे.

     या तीन दिवसीय महोत्सवात भाविकांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. २५ मार्च २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजता साई मंदिर देवस्थान येथून श्री साई पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात येईल. ही मिरवणूक शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करणार आहे. २६ मार्च २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता प्रभू श्रीराम जन्मोत्सवाचा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न होईल. २७ मार्च दुपारी २:०० वाजता प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. सविताताई खरवडे यांचे कीर्तन होईल. त्यांच्या उपस्थितीत ‘काल्याचा कार्यक्रम’ पार पडेल. सायंकाळी ६:०० ते रात्री ९:०० वाजेपर्यंत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

             साई मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्ष नंदुजी पिसे, सचिव महेश पिलारे यांच्यासह पिंटू समर्थ, ऋषीजी चुऱ्हे, शरद ठेंगरी, पराग कुंभारे, मनोज हेमके आणि इतर सर्व सदस्यांनी या मंगलमयी सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये