ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माणिकगड सिमेंट वर्क्सतर्फे माइन्समध्ये क्लब ग्राउंड वर महिला सशक्तीकरणासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

माणिकगड सिमेंट वर्क्सच्या सी एस आर विभागामार्फत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही माणिकगडचे युनिट हेड अतुल कन्सल यांचा दूरदृष्टिकोन वरिष्ठ उपाध्यक्ष मुकेश गहलोत यांचे मोलाचे मार्गदर्शन व ई आर हेड नवीन कौशिक यांच्या साहाय्याने आसपासच्या गावांतील—मानोली, बैलमपूर, जामनी, गोवारीगुडा, नोकरी, बॉम्बेझरी, आसापूर, पेड्डासापूर, गडपांढरवनी आणि लिंगनडोह— येथील महिलांना सन्मान देण्यासाठी तसेच त्यांच्या सांस्कृतिक प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम माइन्स परिसरात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यां रीना शिंदे (माणिकगड सिमेंट वर्क्स), सृष्टी वाडीभसमे (माणिकगड सिमेंट वर्क्स), मनीषा पेंदोर (नोकरी सरपंच), सॅक्सेना मॅडम व सरपटवार मॅडम (लेडीज क्लब, माइन्स), ऋतु पानपट्टे (उजास प्रकल्प) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत रोप व शाल देऊन करण्यात आले, ज्यातून पर्यावरण संरक्षणाचा सुंदर संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमात आयोजित नृत्य स्पर्धेत एकूण 6 गावांतील महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. मानोली गावातील महिलांनी ‘ओला कचरा आणि सुका कचरा’ या विषयावर प्रभावी पथनाट्य सादर करून स्वच्छतेचा संदेश दिला. तसेच, माणिकगड सिमेंट वर्क्सच्या शिवणकला केंद्रातील विद्यार्थ्यांनी आकर्षक वेशभूषा सादरीकरण करून भारतीय संस्कृतीचे सुंदर दर्शन घडवले.

कार्यक्रमात माणिकगडमध्ये कार्यरत अपूर्वा धारा, वंशिका व अंतिम पटेल या महिला अधिकारी यांचा रोप व सन्मान चिन्ह देऊन सन्मान व स्वागत करण्यात आले. यामुळे महिलांचा कोणत्याही क्षेत्रात कमीपणा नसून त्या प्रत्येक क्षेत्रात सक्षमपणे कार्यरत आहेत, हा संदेश अधोरेखित झाला.

नृत्य स्पर्धेचे परीक्षक म्हणून मीना बोराडे, विजया ठावरी व सोनाली मेश्राम (लेडीज क्लब, माइन्स) उपस्थित होत्या. स्पर्धेत गोवारीगुडा गटाने प्रथम क्रमांक, बॉम्बेझरी गटाने द्वितीय क्रमांक तर बैलमपूर गटाने तृतीय क्रमांक मिळवला. सर्व विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख अतिथी रीना शिंदे, श्रुष्टि वाडीभसमे व सरपंच मनीषा पेंदोर, तसेच सक्सेना मॅडम व सरपटवर मॅडम यांनी महिला सशक्तीकरण वरती सर्व गांवतील महिलांना मोलाचे मार्गदर्शन केलेत.

कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेला भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच CSR विभागामार्फत गावातील सर्व आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना त्यांच्या समर्पित कार्यासाठी विशेष सन्मान देण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व ग्रामस्थांसाठी स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था करण्यात आली. या यशस्वी उपक्रमाबद्दल गावकऱ्यांनी CSR टीमचे कौतुक करत आभार व्यक्त केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये