ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कुत्र्याच्या तावडीतून टेकामांडवा पोलिसांनी वाचविले चितळाचे प्राण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- जंगलातून भटकी कुत्र्यांनी चितळाचा पाठलाग करून हिमायतनगर परिसरात चितळाला पकडल्याची माहिती टेकामांडवा पोलिसांना फोनवर मिळताच तात्काळ टेकामांडवा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरिक्षक गोंगले व पो.उ.नि.संतोष चव्हाण यांनी शासकीय वाहनाने घटनास्थळी दाखल होत कुत्र्याच्या तावडून चितळाचे प्राण वाचवित वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांच्या सुपूर्द केले.
भटक्या कुत्र्याने जंगलातून पाठलाग करून चितळाला गावाच्या दिशेने आणल्याने चितळ दमले होते.व जखमीही झाले होते.गावकऱ्यांनी हि माहिती टेकामांडवा पोलिसांना फोनवर दिली आणि पोलिसांनी ही तात्काळ घटनास्थळ गाठले त्यामुळे चितळाचे प्राण वाचले.जखमी अवस्थेत असलेल्या चितळाला तातडीने उपचार मिळावे यासाठी वनरक्षक उध्दव गोटमुकले व वनमजूर विठोबा दोरखंडे यांना बोलविण्यात आले.जखमी अवस्थेत असलेल्या चितळाला गावकऱ्यांच्या मदतीने पिकअॕप वाहनात टाकून पशुवैधकीय दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले व उपचार करून त्या चितळाला जंगलात सोडण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये