गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समुद्रपूर पोलिसांकडून शिवनी पारधी बेडा येथे वॉश आउट मोहीम

आरोपींकडून संपूर्ण मुद्देमाल जप्त करून एकूण २ लाख ८१ हजारावर मुद्देमाल नाश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

        गुन्हयाची थोडक्यात हकीकत या प्रमाणे आहे की, मुखबीरचे खात्रीशीर खबरेवरून पंच व पो. स्टाफसह मौजा शिवनी बेडा येथे वॉश आउट मोहीम राबविली असता, मोहिमे दरम्यान पारधी बेड्यालगत असलेल्या पडीत झुडपी शिवारात यातील दोन्ही आरोपी हे वेगवेगळ्या ठिकाणी गावठी मोहा दारूचा निर्मिती करिता कच्च्या मोहा सडवा रसायन तयार करताना मोक्कावर रंगेहाथ मिळून आल्याने, जागीच मोक्का जप्ती पंचनामा कारवाई करून, दोन्ही आरोपी 1) बेबी बिंजु पवार, वय 40 वर्ष, रा. शिवणी पारधी बेडा, तह. समुद्रपूर, 2) अंजु सुनिल फुलमाळी, वय 35 वर्ष, रा. शिवणी पारधी बेडा तह. समुद्रपूर यांच्या ताब्यातून 1) 86 प्लास्टीक व लोखंडी ड्रममध्ये अंदाजे 4,600 लीटर कच्चा मोहा सड़वा रसायन प्रति लीटर 50 रु प्रमाने 2,30,000 रु, 86 ड्रम किं. 25,800, 2) 08 प्लास्टीक कॅनमध्ये प्रती कॅन अंदाजे 30 ली प्रमाणे एकुण 240 ली गावठी मोहा दारू प्रती ली. 100 रू. प्रमाणे 24,000 रू. व 08 कॅन प्रती कॅन किं 200 रू. प्रमाणे 1,600 रू., असा एकुण जु.किं. 2,81,400 रू. मुद्देमाल करून, जागीच सि.ए. सॅम्पल तयार करून उर्वरित संपूर्ण मुद्देमाल जागीच नाश करण्यात आला, पो.स्टे.ला आरोपी1) बेबी बिंजु पवार, वय 40 वर्ष, रा. शिवणी पारधी बेडा, तह. समुद्रपूर, 2) अंजु सुनिल फुलमाळी, वय 35 वर्ष, रा. शिवणी पारधी बेडा तह. समुद्रपूर विरूध्द नमुद कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

     सदर कारवाई मा पोलीस अधीक्षक श्री. नूरूल हसन सर, मा अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सागर कवडे सर, मा. उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. रोशन पंडीत यांचे निर्देशाप्रमाणे पोलिस स्टेशन समुद्रपूर चे स.पो.नी. मा. श्री. एस.बी. शेगांवकर यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात स.फौ./377 विक्की मस्के, पो.हवा./261 अरविंद येनुरकर, पो.ना./1245 रवि पुरोहित, पो.ना./299 राजेश शेंडे, पो.शि./1626 वैभव चरडे, चा.पो.शि./191 रोशन उईके व 04 गृहरक्षक दलाचे सैनिक यांनी केली

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये