ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दक्षता समितीच्या अध्यक्षपदी गोविंद टोकरे यांची निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील जनतेचा सहभाग राहण्याच्या दृष्टीने सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरित करण्यात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणावर देखरेख ठेण्यासाठी राज्य शासनाने शासन निर्णय २३ जानेवारी २००८ अन्वये राज्यात ग्राम, तालुका, नगरपालिका, महानगरपालिका, व जिल्हास्तरावर दक्षता समित्या गठीत करण्यात येत आहेत. यात शासनाकडून गोरगरीबांना सकस आहार मिळावा व तो रास्त भावात मिळावा,रेशन कार्ड वर्गवारी मध्ये खरोखरच गरज असणारे लाभार्थी आहेत का? रेशन दुकानदार रेशन कार्ड धारकांच्या सोबत कसा व्यवहार करतात, त्यांच्याकडे वितरण करण्यात आलेले अन्न धान्य याचा दर्जा काय आहे.

त्याचे वितरण रेशन दुकानदार व्यवस्थित करतात का? आणि ते अन्न धान्य गरजू लोकांना त्यांच्या हक्कानुसार मिळत का? रेशन अन्न धान्य रेशन दुकान तपासणी करणे यासाठी समिती नेमली जाते त्याला दक्षता समिती म्हणतात. व हीच रेशन वितरण व्यवस्था अधिक सुरळीत व पारदर्शकरित्या व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन जिवती नगर पंचायतच्या दक्षता समितीच्या अध्यक्ष पदी गोविंद टोकरे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल परिसरातून त्यांच्यावर कौतुकांचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये