इंदिरा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये माजी विद्यार्थी स्नेहमिलन संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
इंदिरा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, भानखेडा मध्ये सत्र 98-99 च्या बॅच च्या वतीने स्नेह मिलन कार्यक्रमाचे आयोजन केल्या गेले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य दिपक कदम तर अतिथी म्हणून मा.मनोहर बारस्कर, माजी प्राचार्य, इंदिरा हायस्कूल सालई चे मुख्याध्यापक विठ्ठल पाटील, इंदिरा हायस्कूल सेलडोह च्या मुख्याध्यापिका रंजना बोधने, माजी मुख्याध्यापिका साधना कोल्हे उपस्थित होत्या.
माजी विद्यार्थी,BSF इन्स्पेक्टर किशोर अशोक शेंडे यांनी प्राचार्य दिपक कदम व उपस्थित शिक्षकांना माणवंदना देऊन कार्यक्रमांची सुरवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकतेमधून प्राचार्य दिपक कदम यांनी विध्यार्थ्यांना गुड प्यारेटींग, कुटूंबाचे आर्थिक नियोजन, भावी प्रगतीसाठी शासकीय योजना इत्यादी विषयी मार्गदर्शन केले. माजी प्राचार्य मनोहर बारस्कर यांनी उत्तम आरोग्यासाठी प्रथम आरोग्य क्रम देण्यासाठी मार्गदर्शन केले.
माजी विद्यार्थी अशोक चावरे, राजु मस्कर, संदीप चौधरी, प्रफुल धोपटे, ज्ञानेश्वर देशमुख, रवी हिवंज, विनय निवल, सविता ताकसांडे, सुरेखा बाभुळकर, प्रतिभा बाळसराफ, स्वेता येसनकर, स्मिता पाटील, पूनम राऊत,दिनेश आगे, अतुल लोखंडे, उमेश भोमले, संदीप येसणकर, भारती खवट, सोनाली भुते यांनी आपली सफलता व शालेय पूर्वानुभ कथन केले.
माजी शिक्षकांचा विदयार्थ्यांनी सत्कार करून भेट वस्तू दिल्या. 15 खुर्च्या शाळेला भेट दिल्या.
कार्यक्रमाचे संचालन माजी विद्यार्थी प्रा अमोल धोपटे यांनी केले तर आभार व मार्गदर्शन विठ्ठल पाटील मुख्यध्यापक,सालई यांनी केले.
कार्यक्रमाला माजी अध्यापक विलास फुटाणे, अध्यापिका शिला वरभे, विठ्ठल भाऊ चौधरी तसेच नरेंद्र गलांडे, प्रा पवन आडे, राजेश हरणे,अतुल सोनटक्के,मधुकर मोहिजे, वर्षा नागतोडे, ज्योती सालंकार, अपर्णा सोनकुसरे, प्रा विद्या उईके,सुधीर सायंकार, हर्षवर्धन वैद्य, इत्यादी उपस्थित होते.



